चौकशीसाठी तक्रारकर्त्याचे हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन: पुसद विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने विद्युत रोहित्र कामात भ्रष्टाचार प्रकरण !

पुसद: शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, पुसद या कार्यालयांतर्गत विद्युत रोहित्र व इतर कामांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक शिंदे यांनी केली होती त्या तक्रारीची तक्रारकर्त्यासमोर सखोल चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंता संजय आडे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, पुसद या कार्यालयांतर्गत विद्युत रोहित्र व इतर कामांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बळीराम शिंदे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये प्राप्त माहितीच्या आधारे संकलित करून केली होती.कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. पुसदचे संजय श्रावण आडे यांनी कोटेशन बेसेसवर व डीपी दुरुस्तीच्या नावाखाली अनेक संस्थांना विज वितरण कंपनी कार्यालय, पुसद मार्फत शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून दारव्हा उपविभाग, दिग्रस उपविभाग, पुसद उपविभाग, महागांव उपविभाग, उमरखेड उपविभाग व ढाणकी उपविभागात वीज वितरण पुसद कार्यालयाच्या वतीने दि.१८ जून २०१८ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत मोरया इलेक्ट्रीकल्स, एम. के. इलेक्ट्रीकल्स, महालक्ष्मी इलेक्ट्रीकल्स, वरद इलेक्ट्रीकल्स, सत्यशांती इलेक्ट्रीकल्स, विश्वशांती इलेक्ट्रीकल्स, सुमन इलेक्ट्रीकल्स, गजानन इलेक्ट्रीकल्स, मंगलमुर्ती इलेक्ट्रीकल्स, कस्तुरी इलेक्ट्रीकल्स, श्रध्दा इलेक्ट्रीकल्स, साई इलेक्ट्रीकल्स, धानोरकर इलेक्ट्रीकल्स, अली इलेक्ट्रीकल्स, श्री तायवाडे इलेक्ट्रीकल्स, सत्यसाई इलेक्ट्रीकल्स, पत्रे इलेक्ट्रीकल्स, एन.लाईट इलेक्ट्रीकल्स, मातोश्री इलेक्ट्रीकल्स, सर्व पुसद व इतर बाहेरगावी असलेले यामध्ये औरंगाबाद, नागपूर आंध्रप्रदेश या ठिकाणच्या संस्थांना १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे कोटेशन बेसेसवर कामे देवून सर्व इलेक्ट्रीकल्सची कामे ही कागदोपत्रीच दाखवुन सरकारी निधीची हेराफेरी अफरातफर करुन जवळपास १५० कोटींच्या वर अपहार केली असल्याची तक्रार दाखल केली होती.त्यातून आर्थिक व्यवहारापोटी अनेक संस्थांना आर्थिक फायदा मिळवून दिला असल्याचा खळबोजनक आरोप आंदोलकांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार करताना घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी व इतर १३ मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बळीराम शिंदे, प्रकाश कांबळे व इतर कार्यकर्ते सोमवारपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलनाला बसले आहेत.यासंदर्भात पुसद येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय आडे यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही .