ईतर
पुसद होमिओपॅथी असोशिएशनची कार्येकारिणी गठीत
अध्यक्षपदी डॉ. शशी बजाज तर सचिवपदी डॉ. प्रिती शैलेंद्र नवथळे

पुसद: होमिओपॅथी डॉक्टर्स असोशिएशनची कार्येकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी नूतन कार्यरकारिणी मध्ये असोसिएशनचे अध्यक्षपदी डॉ. शशी कैलाश बजाज, सचिवपदी डॉ. प्रिती शैलेंद्र नवथळे, उपाध्यक्ष डॉ. पैकीने तर कोषाध्यक्ष पदी डॉ. कार्तिक जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर कार्यरकारिणी चा कालावधी एक वर्षाचा राहील असे समिती सल्लागारांनी यावेळी जाहीर केले.यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. पापीनवार व सचिव डॉ. अजय हूरकट यांनी सण 2022-23 चा त्यांच्या कार्येपद्धतीचा लेखा अहवाल सादर केला.याप्रसंगी डॉ. मफन मुंदडा, डॉ. राजेश जाजू, डॉ. सुनील जोशी, डॉ. संजीवनी बिडवयी, डॉ. सुनिता हळदे, डॉ. डंबोळे संह शहरातील इत्यादी होमिओपॅथी डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.