जि.प.बां.उपविभाग पुसद येथील लोकसेवक गंभीर गुन्ह्याच्या तपासात सरकारी पंच म्हणून हजार राहण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा दाखल!

पुसद : शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या कार्यालयातील लोकसेवक यांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गंभीर गुन्ह्यांमध्ये सरकारी पंच म्हणून हजर राहण्यास टाळाटाळ केल्याने या महीला कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले.सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयातील मदतनीस पो. कॉ.२०६६गजानन जाधव यांनी वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फीर्यादी वरुन या महीला लोकसेवका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. श्रिमती एस.व्हि.कांबळे शाखा अभियंता आणि परीचर श्रिमती एस.पी.धनवे अशी गुन्हा नोंद झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयालयातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्राने झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की, पुसद येथील वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने त्यांच्या कार्यालयात मागील अंदाजे एका वर्षापासुन तपास मदतनिस म्हणुन कर्तव्य बजावत आसलेले पोकॉ/२०६६ गजानन शेषराव जाधव हे पोलीस स्टेशन पुसद (शहर) येथे दाखल अप. क्रमांक २७३/२०२५ अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद होवुन तपास अधिकारी हर्षवर्धन बि.जे., सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साो., पुसद यांचे आदेशाने पो. कॉ. २०६६ गजानन जाधव तपासकामी सरकारी पंच आणण्यासाठी दि.१ मे२०२५ रोजी पत्र घेऊन उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद येथे जावून तेथील उपविभागीय अभियंता सतिष नांदगांवकर यांना पत्र दाखवून त्यांचा आदेशाचे पत्र लिपीक रविन्द्र गावंडे यांना दाखवून त्यांच्या अधिपत्याखालील सरकारी कर्मचारी श्रीमती एस. व्ही. कांबळे शाखा अभियंता व श्रीमती एस.पी. धनवे परिचर दोन्ही कर्मचाऱ्याची पंच म्हणून नेमणुक केल्याचे पत्र व त्यांचे संपर्क भ्ररमणध्वनी क्रमांक घेऊन ते परत त्यांच्या कार्यालयात येवून गुन्ह्यां संबंधि कामकाज करीत असतांना ह्या पंच म्हणून नेमणूक केेलेल्या जिल्हा परिषद कार्यालयातील लोकसेवक दोन्ही महीला यांनी आज रोजी ११.०० वा. उपविभागीय कार्यालयात कार्यालयात समक्ष हजर येवून त्यांनी सांगीतले की, आज १ मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे आम्ही झेंडावंदन करीता सकाळपासुन हजर असल्याने आम्हाला १० ते १५ मिनिटात काहीतरी नाष्टा करुन कार्यालयात परत येतो. असे सांगुन ते निघुन गेल्या त्यानंतर फिर्यादी यांनी श्रीमती एस. व्ही. कांबळे यांचे भ्ररमणध्वनी क्रमांकांवर तसेच एस.पी.धनवे यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर वारंवार संपर्क केला असता त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर न देता तपास अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा कॉल रिसिव्ह न केल्याने तपास अधिकारी हर्षवर्धन बि.जे. सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साो., पुसद व फिर्यादी सचिन रमेश सांगळे व तपास पथकातील पोहवा/४०२ गणेश बेन्द्रे, पो.कॉ. २०६६ गजानन जाधव असे घटनास्थळी पंचनामा कार्यवाही न करता यांना परत यावे लागले. त्यामुळे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी श्रीमती एस. व्ही. कांबळे शाखा अभियंता व श्रीमती एस.पी. धनवे परिचर दोन्ही सरकारी पंच म्हणून नेमणुक असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पुसद यांच्या लोकसेवकाने कायदेशीर रित्या पंच म्हणुन कायदयाने घातलेले नियम बंधनकारक असतांना सुद्धा त्यांनी जाणून बुजुन पंच म्हणून हजर न राहण्यास टाळाटाळ केल्यानेमुळे व वरिल नमुद गंभीर गुन्ह्यात घटनास्थळी तपास अधिकाऱ्यांना पंचनामा करता आला नसल्यामुळे या दोन्ही लोकसेवका विरुध्द कलम २२२ भारतीय न्याय संहीता-२०२३ अन्वये वसंत नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंच म्हणून उपस्थित न राहणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या लोकसेवक कर्मचाऱ्यांना हे चांगलेच महागात पडले आहे.