मराठा क्रांती मोर्चा वर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याचा हिवरा संगम येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने निषेध:आज कडकडीत बंद!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी मोर्चा करणारे निष्पाप मराठा समाज बांधवांवर सरकारने लाठीमार केला. सरकाच्या या दंडुकेशाहीचा निषेध करण्यासाठी महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेकडो सकल मराठा समाज बांधवांनी आज येथील छत्रपती शिवराय चौकात एकत्र येऊन निषेध व्यक्त केला मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काल हिवरा संगम बंद ची हाक देण्यात आली होती.
येथील भुसार व्यापारासह सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर अत्यावेक्षक सेवा मेडिकल दवाखाने चालू होते लाठीचार्ज केल्याच्या संपूर्ण प्रकाराची सरकारने चौकशी करावी आणि मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच मराठा समाजाच्या आमदार, खासदार यांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, डॉक्टर धोंडेराव बोरुळकर, राजूभाऊ धोतरकर, यांनी मनोगतातून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी येथील पत्रकार सुनील चव्हाण, महेश कामारकर, विनोद खोंडे, अनिल बोंपीलवार, विशाल कदम, भगवानराव फाळकेसह नंदकिशोर राऊत, गजानन कदम, अवि नरवाडे, रणजीत पाटील, सोनू कदम, शामराव फाळके, नितीन कदम वसंतराव आडकिने, अमोल ठाकरे रवी भगवानराव कदम, रवी प्रकाशराव कदम, आशिष गावंडे, विनोद कदम, यांच्यासह सकल मराठा समाजबांधव खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.