पुसद येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न!

पुसद: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर गजानन मंगलम्,मोती नगर पुसद येथे दि.१९ जून २०२४ रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंग राठोड माजी प्राचार्य,आयटीआय पुसद हे होते.प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक उपस्थित होत्या. तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा.श्री स्वप्निल चिंतामणी,संचालक, चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसद, मा.श्री सचिन जाधव, संचालक, माऊली अकॅडमी पुसद मा.श्री पवन डवले ,उद्योजक, बळीराम इंडस्ट्रीज पुसद,मा.श्री सुरेश गायकवाड, संचालक, विठ्ठल रुक्मिणी इन्स्टिट्यूट पुसद इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यामध्ये प्रामुख्याने दहावी बारावीनंतर पुढे काय? आयटीआय प्रवेश, भविष्यातील रोजगाराच्या संधी, उद्योजकीय दृष्टिकोन,व्यक्तिमत्व विकास, कर्ज सुविधा इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु . दीपाली तिवारी, शिल्पनिदेशिका आय टी आय पुसद, यांनी केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.एम.कापशीकर, शिल्पनिदेशक आयटीआय पुसद यांनी केले व आभार प्रदर्शन एम. एम. देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजना करिता आयटीआय पुसद चे प्राचार्य मा.श्री.बी.एस.कंदोई यांच्या मार्गदर्शनात श्री.एस.डब्ल्यू.खुटाफळे, श्री.एन.पी.कावळे,श्री व्ही.आर.काकणे, श्री.ए.एन.वानखडे, श्री पी एस गोंडे, कु एस आर हट्टेकर, श्री यु पी पवार, श्री के आर सोनार,श्री.व्ही एम गोलाईतकर, श्री.जी एस नगराळे, श्री पंकज नरसिंग, श्री राहुल गावंडे, सौ माला गवई, सौ सुचिता वाकडे, श्री .पडघणे ‘ श्री .बी.जी. राठोड तसेच सर्व मेस्को सुरक्षा रक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.