काळी ( दौ.) येथे शासन आपल्या दारी शिबिर संपन्न!

महागाव. काळी दौ./(संदीप ढगे) : येथे शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ कालीदेश्वर संस्थांच्या प्रांगणामध्ये घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये महसूल विभाग आरोग्य विभाग पुरवठा विभाग सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र निवडणूक विभागातील बी एल ओ युनियन बँक शाखा साई इजारा यांचे मार्फत विविध सेवा सुविधा प्रमाणपत्रे दाखले नागरिकांना देण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन मा जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या सूचनेनुसार व मा उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे साहेब महागाव यांचे मार्गदर्शनात
वि तहसीलदार साहेब राणे तहसील कार्यालय महागाव यांचे मार्फत करण्यात आले. सदर शिबिरास मा उपविभागीय अधिकारी महागाव श्री काळबांडे साहेब श्री देशमुख निवासी नायब तहसीलदार साहेब श्री ज्ञानेश्वर टाकरस गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव श्री रोहनकर साहेब मंडळ अधिकारी महागाव तलाठी श्री वैद्य साहेब श्री पैठणकर साहेब श्री तिडके साहेब श्री बोडके साहेब श्री बळखंडे साहेब ग्रामसेवक श्री राठोड साहेब कृषी सहाय्यक श्री डाखोरे साहेब सर्व कोतवाल हजर होते. काळी (दौ.)च्या सरपंच सौ निशाताई संतोष राठोड ग्राम प सदस्या सौ निशाताई श्रीनिवास मोरे पोलीस पाटील श्री प्रकाश दवणे हजर होते. सदर शिबिरामध्ये विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण मा उपविभागीय अधिकारी श्री एकनाथ काळबांडे व नायब तहसीलदार श्री देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरात एकूण ९४५ विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीनिवास मोरे अतिक पटेल पोलीस पाटील दवणे ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिकांनी सहभाग घेतला.