पुसद तालुक्यातील दुधागिरी तांडा (देवठाणा) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न!

पुसद: तालुक्यातील दुधागिरी तांडा (देवठाणा) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबीरात शेकडो लोकांनी नेत्र तपासणी व मोफत चष्म्याचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दि म्युनिसिपल को.ऑप. बैंक लि.मुंबईचे संचालक दयाराम आडे यांनी केले होते.
या नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य बि.जी.राठोड आणि सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते झाले. तर पुसद येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.बिरबल पवार आणि डॉ.रामचंद्र राठोड यांच्या कडून नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा तांड्यातील शेकडो गरजू नेत्ररोग लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून आयोजक दयाराम आडे यांचे आभार मानले.
दयाराम आडे हे मुंबई सारख्या महानगरात नोकरी करीत करतात. परंतु समाजसेवेचा वसा घेतलेल्या आडेंना वडिलांकडून आपल्यावर झालेले बाळकडू म्हणा किंवा संस्कार म्हणा ते विसरता आले नाही. आपल्या एका प्रयत्नाने जर शेकडो लोकांना दृष्टी मिळत असेल तर यासारखे महत्वाचेकार्य दुसरे कोणतेही नाही. विजयराव चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषणातून दयाराम आडे यांचे कौतुक करताना पे बॅक टू सोसायटीचा खरा अर्थ कळल्याचे प्रतिपादन केले. सदर नेत्र तपासणी शिबीराला दुधागिरी तांडा (देवठाणा) येथिल सरपंच, उपसरपंच, नायक, कारभारी तसेच तंटामुक्त समितीचे पदाधिकारी आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.