राजकिय

सरपंच पदाच्या आरक्षणाकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष..! १२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २३ एप्रिलला आरक्षणाची सोडत..

पुसद : तालुक्यातील १२० ग्रामपंचायतीसाठी पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे (दि.४ मार्च२०३०) पर्यंतच्या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण दि.२३ एप्रिल २०२५ रोजी १२.०० वाजण्याच्या सुमारास बचत भवन, यशवंत रंग मंदीर पुसद येथ़े सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्याकरीता जाहीर सुचना प्रत्येक ग्रामपंचायतीचे सचिव यांचेमार्फत ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्डवर तसेच पंचायत समिती, पुसद तहसीलच्या नोटीस बोर्डवर १९ एप्रिल २०२५रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे तालुक्यातील गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांच्या सुत्रांनी झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की,तहसिलदार, तथा तालुका दंडाधिकारी पुसद यांचे कार्यालय दि.१९ एप्रिल२०२५ रोजी काढलेल्या पत्रानुसार पुसद तालुक्यात १२० ग्रामपंचायती आहेत. निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेले आहे. तालुक्यातील १२० ग्रामपंचायती मध्ये शेलू बु. सावरगांव बं., मांडवा, शिळोणा, वालतुर तांबडे, नानंद इजारा, असोली, सावंगी, म्हैसमाळ, खडकदरी, श्रीरामपुर, उडदी, जामनाईक-२, गहुली, बोरी म, मोहा इजारा, जांबबाजार, कृष्ण नगर, घाटोडी, हर्षी, बान्सी, सावरगांव गोरे, सांडवा, धानोरा इ. दहीवड बु., होरकड, शे. पिंप्री, बुटी ई., आमटी, कारला, मांजरजवळा, वसंतवाडी, शेलू खु, बेलोरा बु., पारवा बु., वडगांव, कोंढई, मारवाडी खु., जगापूर, चिंचघाट, वडसद, बेलदरी, जगापुर, खर्षी, पिंपळगांव मुंगशी, लोणी, माणिकडोह, चोंढी, मरसुळ, आडगांव, कान्होळ, लोहरा ईजारा,जनूना, ब्राम्हणगांव, काकडदाती, बोरी खु., मारवाडी बु., वनवारला, वरुड, खंडाळा इसापूर, माळ आसोली, देवठाणा, जमनी धुंदी, गोळ खुर्द, अनसींग, निंबी, खैरखेडा, भंडारी, धनसळ, आरेगांव बु. लाखी, गौळ बु., चिकणी, वालतूर रेल्वे, धनकेश्वर, बिबी, गायमुख नगर, पार्टी, जवळी, नानंद खु, फेट्रा, हनवतखेडा, नांदुरा इ. जवळा, पांढूर्णा खु. दगड धानोरा, ज्योतीनगर, हिवळणी ता., मोप, गौळ मांजरी, हेगडी, रामपूर नगर, इंदीरानगर, कुंभारी, हुडी खु., वेणी खु., पोखरी, पिंपळखुटा, मुंगशी, फुलवाडी, हिवळणी, पालमपट, काटखेडा, लोणदरी, ईनापूर, बोरगडी, पाढूर्णा, राजना, रोहडा, शिवणी, पन्नाळा, सिंगरवाडी, जमशेटपूर, हुडी बु. व जामनाईक -१. या पैकी तब्बल ६० ग्रामपंचायतीच्या कारभाराचा गाडा महिला सरपंच हाकणार आहेत. हे आरक्षण सोडत पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे (दि.४ मार्च२०३०) पर्यंत सरपंच पदाचे आरक्षण दि.२३ एप्रिल २०२५ रोजी १२.०० वाजण्याच्या सुमारास बचत भवन, यशवंत रंग मंदीर जवळ पुसद येथ़े सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्याकरीता जाहीर सुचना प्रत्येक ग्रामपंचायतीचे सचिव यांचेमार्फत ग्रामपंचायतीचे नोटीस बोर्डवर तसेच पंचायत समिती व तहसीलदार पुसद यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्दी करण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे तालुक्यातील गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले असून सर्वांनाच आरक्षणाची उत्सुकता लागली आहे. मागील गेल्या पाच वर्षात गावात केलेल्या कामाची पावती मिळण्यासाठी अनेक गाव पुढारी ग्रामपंचायत निवडणुकीला पुढे सामोर जातील. परंतु लोकशाहीच्या या सोहळ्यात चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. तर अनेकांना घरचा रस्ता मिळतो. मतदान रुपी जनता जनार्दन मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडतात. परंतु पुढील पाच वर्ष संबंधित लोकप्रतिनिधीच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. त्यावरूनच गावातील गाव पुढारी सरपंच पदाचा मानकरी ठरतो.त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असल्या तरीही गावागावातील गावपुढाऱ्यांची गावात असलेली पत ठरविण्यासाठी हे आरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामीण भागात सरपंच पद प्रतिष्ठेचे –

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून पाहिले जाते. ग्रामीण भागात सरपंच पद हे मानाचा आणि प्रतिष्ठेचे पद मानले जात असल्याने सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याची नशीब आजमावण्यासाठी तयारी करून घेतात.

निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण –

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेले आहे. पुसद तालुक्यातील १२० ग्रामपंचायती पैकी तब्बल ६० ग्रामपंचायतीचा कारभार महिला सरपंच चालवणार आहेत. त्यामुळे अनेक गाव पुढारी काही धोका होऊ नये म्हणून आपल्या पत्नीला राजकारणात आणु शकतात त्यामुळे महिला- पुरुष कोणतही आरक्षण निघाले तरी अनेकांनी तयारी पूर्ण करून ठेवली असल्याची चर्चा गावागावांतील चावडीवर व चौकात चौकात रंगत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close