सरकारला कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी यवतमाळ येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा! शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..
पुसद तालुका व शहर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती

पुसद : राज्य सरकारला कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यवतमाळ येथे दि.९मे२०२५ रोजी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चासाठी पुसद तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दि.६मे२०२४रोजी सायंकाळी हॉटेल अनुप्रभा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते रंगराव काळे शिवसेना जिल्हा समन्वयक (पुसद उमरखेड) मतदारसंघ व पुसद तालुका शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)या पक्षाच्या वतीने दि.६मे२०२४रोजी सायंकाळी हॉटेल अनुप्रभा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते रंगराव काळे शिवसेना जिल्हा समन्वयक (पुसद उमरखेड) मतदारसंघ व पुसद तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, राज्सयातील माहयुतीच्या सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र आता सरकार आपणच केलेल्या घोषणेपासून लांब पळत आहे.महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे, अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट आणि महागडे शेतीचे कीटकनाशके आदींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे पिक विम्याचे हजारो कोटींचे दावे दुर्लक्षित आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे.गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार हात आखडता घेत आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.महायुतीने निवडणुकीच्या वेळेस आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तसेच विविध शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या पण या योजना प्रत्यक्षात मात्र या घोषणा फक्त कागदोपत्रीच राहिल्या त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनांची व कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी याकरिता पुसद तालुक्यातील २००ते २५० ट्रॅक्टर घेऊन दि.९ मे२०२५ रोजी यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच यावेळी आमदार संजयभाऊ देरकर वणी विधानसभा,सौ. सागरताई पुरी ( प. विदर्भ संपर्क संघटिका )राजेंद्रभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख,प्रवीणभाऊ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत वनवासी मारोती ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे ह्या मोर्चात पुसद तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते रंगराव काळे जिल्हा समन्वयक (पुसद उमरखेड) विधानसभा मतदारसंघ व पुसद तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) पक्षाचे रंगराव काळे जिल्हा समन्वयक (पुसद-उंमरखेड )विधानसभा मतदारसंघ,राजू अण्णा वाकडे उपजिल्हाप्रमुख, विजय बाबर पुसद विधानसभा संघटक,सय्यद अब्बास विधानसभा संघटक अल्पसंख्याक आघाडी,राहुल सहारे ग्रामपंचायत सदस्य श्रीरामपूर,अभिलास पाईकराव,गजानन निकस, श्रिमती मालतीताई मिश्रा (महिला आघाडी ),सौ.विद्यांजली पोहरकर (महिला आघाडी), सौ.कावेरीताई दुधे (महिला आघाडी) तसेच शिवसेना ( उबाठा) पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.