पुसद येथे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने’भूमापन दिन’ जनजागृती करुन मोठ्या उत्साहात साजरा!

पुसद: येथील उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ‘भूमापन दिनानिमित भुमी अभिलेख विभागातील आधुनिक कामकाजा बाबत जनजागृती करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जोरवर तहसीलदार पुसद, कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.रमेश पाटील तसेच आयोजक अशोक राठोड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुसद यांच्या हस्ते ‘भुमापन दिनाचे’ औचित्य साधून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच मान्यवर यांचे हस्ते मोजणी साहित्याचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जोरवर व प्रमुख पाहुणे ॲड. रमेश पाटील यांनी आपल्या भाषेनातुन भूमी अभिलेख विभागाच्या नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विनाश सरांद यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश राठोड शिरस्तेदार उपअधीक्षक कार्यालय पुसद यांनी या कार्यक्रमात ग्राम विकास विभाग, महसुल विभाग व भूमि अभिलेख विभागाकडून राबविण्यात येणा-या स्वामीत्व यांजना, ई मोजणी, आज्ञावली, ई फेरफार, अत्याधुनिक माजणी यंत्र राव्हर, व पारंपारीक माजणी पध्दत तं आधुनिक पध्दती बाबत जनजागृती करण्यात आली. स्वामित्व योजनेचे फायदे सांगितले स्वामित्व योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वामित्व कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डमध्ये नागरिकांना कायदेशीर प्रमाणपत्र आणि जमिनीचा मालकी हक्क याबाबत स्वामित्व कार्ड देण्यात येणार आहे.
हे स्वामित्व कार्ड नागरिकांनी बँकेत गहाण ठेवून कर्ज घेऊ शकणार आहे. त्यामुळं जमीन मालकीचे सरकारकडून स्वामित्व कार्डाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.स्वामित्व योजनेंतर्गत अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करुन तालुक्यातील१२० गावठाणातील मिळकत धारकांच्या मिळकतीचे मोजमाप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे अचूक व जलदगतीने सर्व्हेक्षण होत आहे. यामुळे मिळकतधारकांना अद्यावत नकाशे, पीआ कार्ड तयार झाल्याने ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे. अशी कामाच्या प्रगतीची माहिती दिली.
आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या करीता श्री अविनाश सरोदे, श्री सुरेश सुरेश राठोड, आशिष देशमुख, संतोष काजळे, वालाप्रसाद पांड, अरुण राठोड, विनाद कावळे, अशांक ढाल, राजु तिळवं, अमोल गंगासागर, साहेबराव गव्हाण, अमित पांडे, चिपळे साहेब, निलेश साखरे, सचिन धोपे, श्रीमती वहिदा पठाण व मिलिंद सोनटक्के यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात ग्राम विकास विभाग, महसुल विभाग व भूमि अभिलेख विभागाकडून राबविण्यात येणा-या स्वामीत्व यांजना, ई मोजणी, आज्ञावली, ई फेरफार, अत्याधुनिक माजणी यंत्र राव्हर, व पारंपारीक माजणी पध्दत तंत्रज्ञान आधुनिक पध्दती बाबत जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी नागरीक पत्रकार बांधव उपस्थित होते.