‘मागून भीक मिळत असते न्याय नव्हे’ न्याय घेण्यासाठी लढाव लागते ;पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी कुरळी ग्रामस्थांच्या पाठीशी-शेतकरी नेते मनीष जाधव

उंमरखेड: तालुक्यातील अमडापूर प्रकल्प अंतर्गत असलेल्या कुरळी येथील ३४० कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन व मोबदला मिळण्याकरिता दि.२० जानेवारी २०२४पासून या प्रकल्पाच्या बाजूला जंगलात आमरण उपोषण सुरू असून प्रजासत्ताक दिनी जलसमाधी घेण्याचं इशारा जिल्हा प्रशासन व शासनाला प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
या आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले याच उपोषणकर्त्यां शेतकऱ्यांची दखल घेऊन विस्थापितांची उपोषण स्थळी जाऊन शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागणीबाबत प्रकल्पग्रस्तांसोबत विधायक चर्चा करून प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले ” मागून भीक मिळत असते अधिकार नव्हे , झालेला मोठा विलंब होत असून विस्थापित गत -२३ वर्षापासून हा लढा देत आहेत .
या प्रकल्पासाठी जगण्याचा आधार असलेल हक्काचा सातबारा देऊन पुनर्वसन व मोबदल्यासाठी लढावं लागतं हे दुर्दैवी बाब आहे मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या या पीडित कुटुंबाची मोठी उपेक्षा यंत्रणा व शासनाने हे प्रश्न प्रलंबित ठेवून थट्टा प्रतारणा केली झोपी गेलेल्याला उठवणं सोपं असतं पण झोपेच्या सोंग घेतलेल्या या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला जागं करण्यासाठी आपण जो जलसमाधीचा इशारा शासनाला देऊन आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा दिला याच मला सार्थ अभिमान आहे.
कुठल्याही आंदोलकांनी टोकाची भूमिका घेऊ नये आपण हा लढा शहीद भगतसिंग च्या मार्गाने लढत राहावं जीव अमूल्य आहे कुठल्याही आंदोलकांनी चुकीचं व टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन मनीष जाधव यांनी उपोषणकर्त्यांना केले राज्य शासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घ्याव अशी मागणी त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली अधिकारासाठी आपण लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावं असं यावेळी मार्गदर्शन करताना शेतकरी नेते मनीष जाधव यांनी प्रशासनाच्या व शासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवून तीव्र संताप व्यक्त केला या प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी आपल्या न्याय हक्कासाठी एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये मोठ्या संख्येने या आंदोलनात महिलांचा सहभाग आहे काल एका महिलेची प्रकृती खालावली होती त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करावे लागले यावेळी उपोषण स्थळी महागाव व उमरखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी पाडावी यांनी उपोषणकर्त्यासोबत सकारात्मक चर्चा करून आपल्याला निरपेक्ष न्याय देण्याच्या संदर्भाने शासन स्तरावर पाठपुरवठा करण्याचं आश्वासन दिल मंत्रालयाच्या स्तरावर विद्यमान आमदार नामदेवराव ससाणे व लघु पाटबंधारे विभागाचे हेमंत कोल्हे यांच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आणल्या गेल्याचे फोनवरून मनीष भाऊ यांनी अधिकारी सोबत चर्चा केली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विषयाची दखल घेतली असून समोरच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय मार्गी लावण्याचे शासन प्रशासनाकडून आंदोलकांना आश्वासन दिले आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने मोठा तगडा पोलीस बंदोबस्त या आंदोलनाला दिला आहे यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वाल्मिकी पाटील , आत्माराम जाधव , भीमराव इंगोले , कपिल अडागळे , भोजूसिंग चव्हाण , शिलाबाई राठोड , सह जवळपास अडीचशे ते तीनशे उपोषणकर्ते या मंडपात आहे या उपोषण स्थळाला या विभागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबलू जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा गट नंदेश्वर जाधव शिवानंद राठोड स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष युवा त्यांच्यासह सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आहे.