पुसद शहरात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे! -मनिष जाधव शेतकरी नेते

पुसद: केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी द्रोही शेतकरी विरोधी धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावात येवून शेकरी आत्महत्या करत आहे. चालु खरीप हंगामात अमरावती विभागात १०६९ तर ३४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण इथल्या साहेबराव करपे या शेतकर्याने शेती परवडत नाही म्हणून १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्याला आता ३९ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रातली ती अधिकृत अशी पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून सर्व शेतकर्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी पुसद तहसील कार्यालयासमोर सकाळी ११:००वाजण्याच्या सुमारास एक दिवसीय अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याने या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलनाचे संयोजक शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी द्रोही शेतकरी विरोधी धोरणामुळे यवतमाळ जिल्हयातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावात येवून शेकरी आत्महत्या करत आहे. चालु खरीप हंगामात अमरावती विभागात १०६९ तर ३४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकर्याने शेती परवडत नाही म्हणून १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्याला आता ३९ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रातली ती अधिकृत अशी पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहेत.या सर्व आत्महत्या कापुस आणि सोयाबीन उत्पादकांच्या आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रास चालु करून केंद्रास मार्च २०२५ पर्यंत मुद्दत देण्यात यावी. त्यास सोबत चालु खरीप हंगामातील अतिवृष्टीची नैसर्गीक आपत्ती विभागाची आर्थीक मदत देवून पिक विमा सुद्धा तात्काळ शेकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा.राष्ट्रपिता महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्त योजने अंतर्गत नियमित कर्जफेड करण्याऱ्या २२५०० यवतमाळ जिल्हातील प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्सापर अनुदान देण्यात यावे. या सर्व मागण्या शासनस्तरावर तात्काळ मान्य कराव्या तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीपूर्वी आम्ही जर सत्तेत आलो, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र, झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटत आहे. शेतकरी प्रचंड प्रमाणात हवालदिल झाला आहे.सरकारने आश्वासन देवूनही कर्ज माफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने शेतकरी पेटून उठणाला आहे.शेतमालाला हमीभावाचा अभाव , सततची नापिकी , नैसर्गिक आपत्ती , कर्जबाजारीपणा , जीवनावश्यक वस्तू कायदा मुळे शासनाला अनावश्यक हस्तक्षेप करण्याची मिळालेली संधी , कमाल जमीन धारणा कायदा , भूसंपादन यासारख्या शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हायला हवे व शेती ही बंधन मुक्त व्हायला हवी या कृषीप्रधान देशातील होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे व याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना केंद्र शासनाने निरपेक्ष न्याय द्यावा अशा विविध मागण्यासाठी व शेतकर्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च २०२५रोजी पुसद तहसील कार्यालयासमोर सकाळी ११:००वाजण्याच्या सुमारास शरद मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक ली पुसद अविनाश पोळकट, संभाजीराव टेटर , जिनकर राठोड , विकास भाऊ राठोड सौ संध्याताई संदेश रणवीर उपस्थिती एक दिवसीय अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याने या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञ व निषेध दिन व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलनाचे संयोजक शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले आहे.