पुसद शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती निमित्त रॅली काढून अभिवादन!

पुसद: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त पुसद शहरातील मध्यवर्ती स्मारक पूर्णाकृती पुतळ्याला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व शहरातून रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भीमराव दादा कांबळे यांच्या हस्ते करून पूर्णाकृती पुतळ्यास, प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष, मिलिंद जाधव, पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव कांबळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आजच्या जयंतीदिनी समता सैनिक दलाचे प्लाटून कमांडर भारत कांबळे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.उपस्थित महिला मंडळाच्या धम्म उपासिका यांच्या वतीने सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.यावेळी प्रामुख्याने उपस्थित पुसद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत वायकोस,प्रज्ञापर्व समितीचे कार्याध्यक्ष राजेश ढोले,प्रज्ञापर्व माजी अध्यक्ष,बुद्धरत्न भालेराव,किशोर दादा कांबळे,एडवोकेट विश्वासराव भवरे, किशोर मुजमुले बाबाराव उबाळे, कमलेश पाटील, पाढेन सर भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, संतोष गायकवाड भोलानाथ कांबळे, विनोद कांबळे, गोविंद कांबळे तसेच विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी सहित असंख्य महिला व असंख्य धम्म बांधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यकर्माचे सूत्र संचालन नरेंद्र पाटील सर यांनी केले.