पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना पुसद शहरात कॅण्डल मार्च काढून वाहीली श्रध्दांजली!

पुसद : काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार करून भ्याड हल्ला केला त्यावेळी हे खोरं किंकाळ्यांनी भरून गेलं. निरपराध पर्यटकांना घेरून, त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २७ पेक्षा जास्त लोकांची क्रूरपणे हत्या केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडले. त्या सर्व मृत्यूखी पडलेल्या देशबांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुसद अर्बन बँकचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वाखाली
काल सायंकाळी ७:००वाजण्याच्या सुमारास पुसद अर्बन बँक ते तहसील कार्यालया समोरील जयस्तंभ पर्यंत कॅण्डल मार्च काढून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी शरद मैंद म्हणाले की, निरापराध पर्यटकाची दहशतवाद्याहत्या केली या कठीण समयी आपण सर्व जण भारत सरकारच्या पाठिशी खंबीरपण उभे आहोत. भारत सरकार या दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड उत्तर देईल असा विश्वास दर्शवून मृत पर्यटकाना ईश्वर चिरशांती देवो अश्या शब्दात संवेदना व्यक्त केल्या.यावेळी लॉयन्स क्लब ऑफ पुसद सिटी चे अध्यक्ष प्रा बंडू खराटे यांनी सुद्धा श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. मनिष अनंतवार यांनी संचालन केले.
या प्रसंगी पुसद अर्बन बँक , भारती मैंद पतसंस्था, सामाजिक उपक्रम समिती,,लायन्स क्लब ऑफ पुसद सिटी , बिरसा मुंडा ब्रिग्रेड ,कुस्ती मल्ल विद्या महासंघ व विविध संघटनांतर्फे मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी साहेबराव ठेंगे, पांडुरंग व्यवहारे ,नाना बेले ,भारत जाधव ,नारायण क्षीरसागर, ,नारायण जाधव, यशवंतराव चौधरी, नानासाहेब जळगांवकर, के जी चव्हाण, उत्तमराव वानखेडे,डॉ गौतम,सतीश जैस्वाल, बी, मनोज पांडे, परमेश्वर भैया जैस्वाल, गणेश डांगोरिया, ललित सेता, प्रवीर व्यवहारे, विनायक डुबेवार रणजित सांबरे, सुनील चव्हाण,, किरण वानरे,दीपक अवचार,संतोष अग्रवाल, ॲड.बालाजी कपटे,राजूभाऊ भिताडे,दीपक जाधव,नारायण क्षीरसागर, ऍड गोपाल मस्के, सगमनाथ सोमावार, पंडितराव देशमुख,राजेश विश्वकर्मा,पिंटू फुके, ॲड.मनोज घाटगे, सोमेश्वर जाधव, कैलास जळगांवकर, निरंजन माने, सय्यद काशीद, अमोल नाईक, सुधाकर दुर्गे, सुमित बोडखे, प्रदीप नागठाणे प्रवीण कदम,ऍड शिवाजी खराटे अक्षय सांबरे, अब्दुल सादिक अब्दुल सलीम, नवनाथ देशमुख,यश काळे, धनंजय दळवी, अजय दळवी, दीपक ठेंगे, अजित लोंढे, तुषार वायकुळे, गजेंद्र चापके, राजेश दळवी, अनिकेत पाटील,अमोल नाईक, राधेशाम दिंडे,रमेश लोंढे ,नरेंद्र खंदारे ॲड.जुनेद शेख, ,विनायक सेवकर,गजानन नाकाडे,संदेश रणवीर तसेच पुसद अर्बन बँक, भारती मैंद नागरी सह पतसंस्थचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कँडल मार्च काढून या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली..