नायलॉन मांजानं पंचायत समिती कर्मचाऱ्याचा चिरला गळा ; बंदी असूनही नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री!

पुसद : सध्या नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका पंचायत समिती कर्मचाऱ्याचा गळा चिरला असुन हा नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की मकरसंक्रांती निमित्त ठिक ठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडविताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. सध्या नायलॉन मांजावर बंदी असताना देखील पुसद शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास एका पंचायत समिती कर्मचाऱ्याचा या नायलॉन मांजामुळे गळा चिरला आहे. संजय राठोड असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दि.१४ जानेवारी २०२५ रोजी संजय राठोड हे घरून आपल्या दुचाकीवरून पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त जात असताना कुस्त्यांच्या आखाड्या जवळिल परिसरात के.जी.एन. चिकन शॉप समोरील रस्त्यावर आचनक मांजा गळ्यात अडकल्याने त्यांचा काही कळायच्या आत हात व गळा चिरला ही घटना त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतला त्याच्या गळ्यावर गंभीररित्या जखमी झाले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.नायलॉन मांजा विक्रेत्या आणि वापरकर्त्यां विरोधात तसेच नायलॉन मांजाच्या वापरामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.