वडगाव येथे जुगार खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड!

पुसद: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वडगांव येथील रमेश बन्सीलाल जाधव यांचे घराचे खुल्या जागेत काही लोक एकत्रीत गोल रिंगनकरून मध्यभागी पैसे लावून एक्का बादशहा नावाचा ५२ पत्ते जुगार खेळ खेळवित असल्याची खात्रीशिर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून त्या घरावर दोन पंचासमक्ष धाड टाकली असता सदर ठिकाणी रमेश बन्सीलाल जाधव, दुर्योधन रामराव आडे, सुरेश भिमराव आडे सर्व रा. वडगाव ता पुसद असे ५२ पत्ते जुगार खेळ खेळत असतांना मिळून आले. तर पोलिसांना पाहून काही जुगारी पसार झाले.सदर धाडीत २९११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वरील इसमांवर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि, गजानन गजमारे, सपोनि अमोल सांगळे यांच्या पथकासह केली असल्याचीी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.