आंबेडकरी विचारावर मार्गक्रमण हेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना खरे वंदन-विठ्ठलरावराव खडसे

पुसद:डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दोन दिवसीय प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.प्रबोधन पर्वाचे उदघाटन धम्म गुरू पुज्य.भदंत कमलबोधी याचे हस्ते संपन्न झाले तर मा विठ्ठलरावराव खडसे होते. महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच देशाचे व आम्हा समस्त बहुजनाचे उध्दारक आहेत असे मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले तर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकराचे जयंती ही नाचून नव्हे तर वाचुन साजरी झाली पाहीजेत असे उदगार प्रबोधन पर्व आयोजन समीतीचे आयोजक प्रा अंबादास वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन मांडले या नंतर प्रा.अविनाश नाईक नांदेड प्रस्तुत यशोगाथा महासुर्याची या बुध्द भीम गीतांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला.
कार्यक्रमास प्रमुख अतीथी म्हणुण डाॅ.मोहमद नदिम, दिगांबर जगताप ,राजेश सोंळके ,संतोष सुरवाडे, राजेंद्र वाघमारे,राजु भाऊ दुधे, बाळासाहेब वाठोरे परमेश्वर जैस्वाल सह अनेक मान्यवर ऊपसथीत होते
लुबीनी महीला मंडळाने अतिशय छान स्वरात बुध्द वंदना सादर केली तर अनुश्री नरवाडे आणी अथर्व नरवाडे या चिमुकल्या नी जापानी भाषेतील बुध्द वंदना सादर करून प्रेक्षकांची मने जींकली. प्रा अविनाश नाईक नांदेड यांनी यशोगाथा महासुर्याची या संगीतमय आणी सांस्कृतिक प्रबोधनातुन “कुणी नाही केल भल व माय भीमान केल दिलच दालन खुल व माय भीमान केल” या व अशा अनेक भीम गीता मधुन प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सुरेख आणी प्रभावशाली संचालन प्रवीण कांबळे यांनी केले तर आभार प्रबोधन पर्व समीतीचे नितेश खंदारे यानी मानले या कार्यक्रमाला भीम अनुयायी मोठ्या संख्येत ऊपसथीत होते.