शरद मैंदं यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती!

पुसद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी शरद मैंदं यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शरद मैंद यांची प्रामुख्याने सहकार क्षेत्रातील नेते म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शरद मैंदं यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बसवराज पाटील नगराळकर, रवींद्र पवार,यांच्यासह अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद मैंद यांनी सहकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सतत विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते नेहमी लढा देत आहेत. मैद यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद देवून त्यांना राज्यात काम करण्याची पक्षाच्यावतीने संधी देण्यात आलेली आहे.पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करुन पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वशक्तीनिशी शरद मैंदं हे योगदान देतील तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाच्यावतीने ठेवण्यात आलेली आहे.शरद मैंद यांची राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला बळकटी मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवराकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत असुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.