२३ वर्षीय तरुणाचा सांडपाण्याच्या नालीमध्ये पडून मृत्यु; शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसदो: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नविन पुसद (आंबेडकर वार्ड) येथे राहणाऱ्या तरुणाचा लोकहित विद्यालयासमोरील नालीमध्ये दि.१० डिसेंबर २०२३ रोजीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.तरुणाचा घातपात असल्याचा संशय निर्माण झाला होता. परंतु सदर तरुणाचा मृत्यू नगर परिषदेच्या सांडपाण्याच्या नालीमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहर पोलीस स्टेशनमध्ये मृतदेहांची नोंद मर्ग म्हणून दाखल करण्यात आली आहे. राजू गोविंद शिंगणकर वय २३ वर्षे असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,दि.१० डिसेंबर २०२३ रोजीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लोकहित शाळेसमोर असलेल्या डॉ.रवणे यांच्या दवाखान्यासमोरील सांडपाण्याच्या नालीमध्ये मृतदेह आढळून आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता तो तरूण नवीन पुसद (आंबेडकर वार्ड) येथील रहिवाशीअसल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर शहर पोलिसांनी मृतकाचे वडील गोविंद शिंगणकर यांना बोलवून राजू याचा मृतदेह असल्याचीओळख पटविली असता पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह पुसद येथील उपजिल्हा शासकीय शासकीय रुग्णालयामध्ये दाखल नेले असता उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर मृतकाचा वडील गोविंदा वेलाजी शिंगणकर वय ५४ वर्ष रा.नवीन पुसद यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्याा फिर्यादीवरू पोलिसांनी मर्ग दाखल करून घेतला आहे. सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय राजू खांदवे करीत आहेत.. पण २३ वर्षाचा तरुण मुलगा गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्या नालीमध्ये मृतदेह आढळला या नालीची पुसद नगर परिषदेने आज पर्यंत साफसफाईची केली नसल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्यामुळे त्या नालीत कचराभरपूर प्रमाणात अडकून असल्याने त्याजागी सांडपाणी तुंबले होते त्यामुळेच या नालीच्या सांड पाण्यात आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आई वडील व नातेवाईकांनी केला आहे.