ईतर

खंडाळा घाटातील वळणावरील खड्डा देतो अपघाताला निमंत्रण; दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

पुसद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पुसद-वाशीम मार्गावरील खंडाळा घाटात धोक्याच्या वळणावर मागील दोन वर्षांपासून भल्ला मोठा खड्डा पडल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हे अपघाताचे प्रणव स्थळ निर्माण झाल्याने अपघातास आमंत्रण देत आहे. लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्याला दुरूस्तीची गरज आहे. परिसरातील माळ पठारावरील गावांना एकमेकांशी जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने तसेच माहुर-मुंबई-पुणे जाण्यासाठी या मार्गावर दिवस-रात्र वाहतूक सुरू राहते. सततच्या वाहतुकीमुळे या मार्गावर असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नेहमी अपघात होतात या मार्गावरून कीत्येकवेळा लोकप्रतिनिधी सुद्धा गेले असतील परंतु लोकप्रतिनिधीनां कींवा संबंधित प्रशासननाला हा खड्डा दिसत नाही बऱ्यादा सुज्ञ नागरिकांनी या खड्ड्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी लेखी तक्रारी केल्या पण या खड्ड्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अभियंता कर्मचारी कींवा या रस्त्यांची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या मुजोर कंत्राटदार कीवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुज्ञ नागरिकांना वेड्यात काढल्याचे चित्र आहे.या खड्ड्यांमुळे एखाद्या मोठा अपघात किंवा जिवितहानी होण्याची हे प्रशासन वाट पाहत आहे का.?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.तेंव्हाच यांना जाग येईल.

याबाबत झेप न्यूज ला मीळालेली माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पुसद- वाशीम मार्गावर खंडाळा घाटात धोक्याच्या वळणावर भला मोठा खड्डा पडल्याने वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत असुन या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी या पुसद – वाशीम रस्त्याची निर्मिती करण्यात आली.या रस्त्याच्या कामाची पाच वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नव्यानेच निर्माण झालेल्या व अतिशय गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या वानांचा अनेकदा वाहनांवरीलचालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघातही घडत असतात
त्यामुळे खंडाळा घाटात वळणावरील रस्त्यांत रस्ता तयार केल्यानंतर पंधरा दिवसात भला मोठा खड्डा पडला हा रस्ता माहुर- मुंबई- पुणे अशा मेट्रो शिटीशी व देवस्थानाशी तसेच आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील माळ पठारावरील गावांना जोडणारा आसल्याने या रस्त्यावरून हजारो प्रवाशांना व नागरीकांना ये-जा करावी लागते त्यांतच मुंबई पुणेसाठी जवळपास या शहरातुन या मेट्रो सिटी ला ये-जा करणाऱ्या ४०ते५०ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहेत ह्या ट्रॅव्हल्स वाल्यांचे रात्री लाईट अप्पर डिपर सुद्धा देत नाही त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यातच खंडाळा घाटात वेगाने वाहने ये-जा करणारे वाहनाने अशातच या घाटाच्या वळण रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने अनेक वाहनाचे अपघात होवून त्यांना गंभीरइजा झाली आहे तर काहीना आपल्या शरीराचे अवयव ही गमावले आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून या खड्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कींवा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अधिकारी कर्मचारी अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.दोन वर्षांपासून भल्ला मोठा खड्डा पडला तरीही संबंधित प्रशासनाला जाग येत नाही. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रणव स्थळ निर्माण झाल्याने अपघातास आमंत्रण देत आहे. लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्याला दुरूस्तीची गरज आहे. मात्र या रस्त्यावर दिवस-रात्र वाहतूक सुरू असून सततच्या वाहतुकीमुळे या मार्गावर असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नेहमी अपघात होतात या मार्गावरून कीत्येकवेळा लोकप्रतिनिधी सुद्धा गेले असतील परंतु लोकप्रतिनिधीनां कींवा संबंधित प्रशासननाला हा खड्डा दिसत नाही बऱ्यादा सुज्ञ नागरिकांनी या खड्ड्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी लेखी तक्रारी केल्या पत्रकारांनी या संदर्भात बातम्याही प्रकाशित केल्या पण या खड्ड्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी उपअभियंता कर्मचारी कींवा या रस्त्यांची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या मुजोर कंत्राटदार कीवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुज्ञ नागरिकांना वेड्यात काढल्याचे चित्र आहे.या खड्ड्यांमुळे एखाद्या मोठा अपघात किंवा जिवितहानी होण्याची हे प्रशासन वाट पाहत आहे का.?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.तेंव्हाच यांना जाग येईल.प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांसाठी अँड्रॉइड ॲप पॅथोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टिम फक्त कागदावर सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजी कारभार या खड्ड्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे आता या खड्ड्यात संदर्भात सुज्ञ नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलन उभं करावे तेव्हा संबंधीत प्रशासनाला जाग येवू शकते.अशी चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close